INDIA

तिळवणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर; इच्छुकांच्या हालचालींना वेग

तिळवणी (वार्ताहर) – आगामी ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर तिळवणी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तिळवणी ग्रामपंचायतीच्या चार प्रभागांतील एकूण 11 सदस्य पदांसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

प्रभाग क्र. 1 (3 सदस्य)

  • अनुसूचित जाती – महिला
  • सर्वसाधारण – महिला
  • सर्वसाधारण – खुला (पुरुष/महिला)

प्रभाग क्र. 2 (3 सदस्य)

  • अनुसूचित जाती – महिला
  • सर्वसाधारण – महिला
  • सर्वसाधारण – खुला (पुरुष/महिला)

प्रभाग क्र. 3 (3 सदस्य)

  • सर्वसाधारण – महिला
  • अनुसूचित जाती – महिला
  • अनुसूचित जाती – पुरुष

प्रभाग क्र. 4 (2 सदस्य)

  • अनुसूचित जाती – पुरुष
  • सर्वसाधारण – पुरुष

दरम्यान, यापूर्वीच जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तिळवणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पद ना.मा.प्रवर्ग (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.

गावातील विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या या आरक्षणामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज व निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
17:43
📰 तिळवणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर; इच्छुकांच्या हालचालींना वेग | 📰 आरक्षणावर डल्ला? कोल्हापुरात खळबळ; चौकशीची जोरदार मागणी | 📰 “तिळवणीच्या बाजारात प्रत्येक सोमवारी घडतंय… पण कोणी बोलत नाही!” | 📰 “धमकी, दहशत आणि अत्याचार… कोल्हापुरातील रात्रभर चाललेला थरार” | 📰 कोंडिग्रेत बनावट दारू कारखान्यावर छापा; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक |