
कबनूर ; प्रमोद बाबासो शिंगे व त्यांची पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर .दि 20.09.25 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी कोयताने जीवघेणा हल्ला केला.
शिंगे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. काम आटोपून ते खाली येवून कारमध्ये बसत असताना हा हल्ला झाला. एकूण ४ हल्लेखोर होते. त्यामध्ये जमीर मुल्ला व त्यांचा मुलगा आर्यन मुल्ला (रा. जांभळी) आदीसह अन्य दोघांचा सहभाग असल्याचे समजते. हल्ल्यावेळी शिंगे व त्यांच्या पत्नी चारचाकी गाडीत बसल्याने ते बचावले. हल्ल्यानंतर हल्लेखोरानी पलायन केले.हल्ल्यामध्ये शिंगे यांच्या कारच्या मागील, पुढच्या व बाजूच्या काचा हल्लेखोरांनी फोडल्या. त्यामुळे कारचेही नुकसान झाले. तसेच घटनास्थळी दोन एडके पडले होते. हल्ल्लेखोरांनी हल्ल्यासाठी नवीन एडके वापरले होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही मोडतोड केली. या हल्ल्यात शिंगे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट घटनास्थळी तुटून पडले होते. तसेच त्यांच्या पोटावर, मानेवरही वार झाला आहे. तर त्यांच्या पत्नीच्या हाताच्या पंजालाही इजा झाली आहे.
शिंगे व त्यांच्या पत्नी यांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. ही बातमी समजताच शिवाजीनगरचे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. चारचाकी व हत्यारे जप्त केली. कबनूर पोलिस चौकीपासून ५० ते ६० फूट अंतरावरच ही घटना घडलेने गावात खळबळ उडाली आहे.