सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रत्यक्ष कामकाज सोमवार, दि. 18 ऑगस्ट पासून नियमितपणे सुरू होत आहे. या कामकाजासाठी यापूर्वी अधिकार्याने कर्मचार्यांच्या नियुक्ती करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी रुजूही झाले आहेत. सर्किट बेंचमध्ये चालवल्या जाणार्या खटल्यांची सर्व कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयातून कोल्हापुरात स्थलांतरित करण्याचे ही काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे.
न्या. कर्णिक आणि न्या. देशमुख यांच्याकडे सर्व प्रकारच्या पीआयएल (जनहित याचिका), सिव्हिल रिट पिटीशन (सर्व दिवाणी याचिका), सर्व प्रथम अपील, सर्व प्रकारचे कौटुंबिक दाव्यांचे अपील, सर्व अवमान याचिकांचे अपील, सर्व प्रकारच्या कर कायद्यावरील सुनावण्या, व्यावसायिक न्यायालयीन कायदा 2015 च्या कलम 13 अंतर्गत सर्व अपील, सर्व पेटंट अपील, सर्व प्रकारच्या फौजदारी रिट याचिका, सर्व फौजदारी अर्ज, सर्व फौजदारी अपिल, मृत्युदंडाचे अपील, फौजदारी अवमान याचिका, सर्व प्रकारच्या पॅरोलसंबंधी याचिका यांसह इतर सर्व दिवाणी आणि फौजदारी कामकाज चालणार आहे.
न्या. दिघे यांच्याकडे सर्व फौजदारी अपील, फौजदारी अर्ज आणि फौजदारी रिट पिटिशन, सर्व जामीन, अटकपूर्व जामीन अर्ज तसेच सर्व प्रथम अपील, किरकोळ दिवाणी अर्ज आदी फौजदारी कामकाज देण्यात आले आहेत.
न्या. चपळगावकर यांच्याकडे सर्व प्रकारच्या सिंगल कोर्टाशी संबंधित दिवाणी रिट पिटिशन, सर्व दिवाणी दुसरे अपील, सर्व दिवाणी अर्ज, सर्व पुनर्विचार अर्ज, सर्व आदेशावरील अपील आदी दिवाने कामकाज सोपवण्यात आले आहे.
